NCP : श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) आणि नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार (Ajit Pawar) गटात कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने श्रीगोंदा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.
नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षासह ११ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
जगताप नागवडे सहमती एक्सप्रेस पुन्हा धावणार
जगताप नागवडे सहमती एक्सप्रेस पुन्हा एकदा जोरात धावणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांची डोकेदुखी वाढणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार पक्षप्रवेश होत आहे. या आगोदर काँग्रेस नेते घनश्याम शेलार तसेच मंत्री विखे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करणारे माजी आमदार राहुल जगताप आणि उद्धव सेनेला रामराम करत राजेंद्र नागवडे यांनी दोन्ही नेत्यांनी अचानक एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
अवश्य वाचा : पर्यावरण रक्षणासाठी विघटनशील प्लास्टिक हेच भविष्य : मुख्यमंत्री
पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित (NCP)
यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, अशोक सावंत, भगवान पाचपुते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.