NCP Sharadchandra Pawar : नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; ‘राष्ट्रवादी’कडून साेमवारी मुलाखती

NCP Sharadchandra Pawar : नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; 'राष्ट्रवादी'कडून साेमवारी मुलाखती

0

NCP Sharadchandra Pawar : नगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharadchandra Pawar) पक्षाकडून जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत २१ जणांनी अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांच्या साेमवारी (ता. ७) पुणे येथे मुलाखती हाेणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

NCP Sharadchandra Pawar : नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; 'राष्ट्रवादी'कडून साेमवारी मुलाखती
NCP Sharadchandra Pawar : नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी; ‘राष्ट्रवादी’कडून साेमवारी मुलाखती

नक्की वाचा: ‘त्यांची नियत खराब होती,म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला’,राहुल गांधींची टीका

जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद

इच्छुकांमध्ये भाजपसह इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीला (पवार गट) जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. नगर जिल्ह्यात बारा मतदारसंघ आहेत. त्यातील आठ जागांवर राष्ट्रवादीचा दावा आहे. कर्जत-जामखेड, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, नगर शहर, अकोले, कोपरगाव, पारनेर आदी मतदारांचा त्यात समावेश आहे. सर्वच ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिले जातील. जागावाटपाबाबत दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. एखाद-दुसऱ्या जागेची अदलाबदल होण्याची शक्यताही फाळके यांनी व्यक्त केली.

अवश्य वाचा: मोठी बातमी!मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ

मतदारसंघनिहाय इच्छुक (NCP Sharadchandra Pawar)

अकोले – अमित भांगरे, मधुकर तळपाडे

कोपरगाव – दिलीप लासुरे, संदीप वर्पे

शिर्डी – रणजित बोठे, ॲड. नारायण कार्ले

नेवासे – डॉ. वैभव शेटे

शेवगाव-पाथर्डी – प्रताप ढाकणे, विद्या गाडेकर

राहुरी – आमदार प्राजक्त तनपुरे.

पारनेर – राणी लंके, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखडे

नगर शहर – डॉ. अनिल आठरे, शौकत तांबोळी, अभिषेक कळमकर

श्रीगोंदे – बाबासाहेब भोस, राहुल जगताप, श्रीनिवास नाईक, अण्णासाहेब शेलार.

कर्जत-जामखेड- आमदार रोहित पवार.