Anna Bansode:राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष!

0
Anna Bansode:राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष!
Anna Bansode:राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष!

नगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची विधानसभेचे उपाध्यक्ष (Deputy Speaker of the Legislative Assembly) म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीच्या वतीने केवळ बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत हा वैध ठरला आहे. अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे.

नक्की वाचा : ‘मी आरोपांवर उत्तर देत नाही’;कुणाल कामराच्या गीतावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया  

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच (Anna Bansode)

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती.मात्र,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्या नावाशिवाय लातूरचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं चर्चेत होती. मात्र, अण्णा बनसोडे यांचीच विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

अवश्य वाचा : कॉमेडियन कुणाल कामराची चार पानी पोस्ट चर्चेत;पोस्टमध्ये नेमकं काय ?  

अण्णा बनसोडे यांची कारकीर्द ?(Anna Bansode)

अण्णा बनसोडे हे २००९ मध्ये पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले होते.त्यानंतर २०१९ आणि २०१४ अशी सलग दोनवेळा त्यांनी आमदारकी मिळवली.राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली. दादांच्या बालेकिल्ल्याचे पिंपरीचे शिलेदार म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here