NDA : अहिल्यानगरच्या ईशान परभाणेचा एनडीए परीक्षेत मानाचा तुरा

NDA : अहिल्यानगरच्या ईशान परभाणेचा एनडीए परीक्षेत मानाचा तुरा

0
NDA : अहिल्यानगरच्या ईशान परभाणेचा एनडीए परीक्षेत मानाचा तुरा
NDA : अहिल्यानगरच्या ईशान परभाणेचा एनडीए परीक्षेत मानाचा तुरा

NDA : नगर : नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) (एनडीए-एनए 2-2024) परीक्षेत अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) ईशान निखिल परभाणे याने यश मिळविले आहे. ईशानने या परीक्षेत (Exam) देशात १४९ व्या स्थान मिळविले आहे. या परीक्षेतून देशात ७९२ विद्यार्थी निवडले गेले आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदावर होणार रुजू

ईशान हा राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज, देहरादून या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो आरआयएमसीच्या १९७ व्या बॅचचा विद्यार्थी आहे. जुलै २०२० च्या बॅचसाठी त्याची ऑल इंडियामधून १४व्या रँकवर निवड झाली होती. एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता ईशानला चार वर्षांची खडतर ट्रेनिंग पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदावर तो रुजू होईल, अशी माहिती त्याचे वडील निखिल परभाणे यांनी दिली.

अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

ईशानने मिळविला देशात १४वा क्रमांक (NDA)

दरेवाडी (ता. नगर) येथील कर्नल परब स्कुलमध्ये ईशानने इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कर्नल दिलीप परब व गीता परब यांचे त्यास मार्गदर्शन लाभले. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परीक्षेत ईशानचे देशात १४वा क्रमांक मिळविला होता. महाराष्ट्र राज्यातून दरवर्षी केवळ दोनच विद्यार्थी निवडले जातात. त्यात ईशानची निवड झाली होती. त्या परीक्षेत ईशानला ४००पैकी ३०५ गुण मिळाले होते. त्यासाठी त्याला कर्नल परब स्कुलचे संचालक कर्नल दिलीप परब यांचे मार्गदर्शन मिळाले होते. या परीक्षेतून देशातील केवळ २५ विद्यार्थी निवडले जातात. त्यातही ईशान १४व्या स्थानावर होता. ईशान हा येथील निखिल लाईट हाऊस व सनी इलेक्ट्रीकल्सचे संचालक तथा अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशने उपाध्यक्ष निखिल परभणे व तृप्ती परभाणे यांचा मुलगा आहे.