NDA’s Victory in Bihar : बिहारमधील एनडीएच्या विजयाने कर्जतमध्ये जल्लोष 

NDA's Victory in Bihar : बिहारमधील एनडीएच्या विजयाने कर्जतमध्ये जल्लोष 

0
NDA's Victory in Bihar : बिहारमधील एनडीएच्या विजयाने कर्जतमध्ये जल्लोष 
NDA's Victory in Bihar : बिहारमधील एनडीएच्या विजयाने कर्जतमध्ये जल्लोष 

NDA’s Victory in Bihar : कर्जत : बिहार राज्यात विधानसभा निवडणुकीत एनडीए (NDA’s Victory in Bihar) सरकारला अभूतपूर्व यश मिळाले असून विरोधकांचा सुपडा साफ झाल्याने कर्जत भाजपाच्यावतीने (BJP) फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी

मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा

शुक्रवारी बिहार राज्याची विधानसभा निवडणुकीचा निकाल होता. या निकालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा एनडीए सरकारने सुरुवातीपासून एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने आकडेवारी गाठली. या एनडीए सरकारच्या अभूतपूर्व यशामुळे दुपारी १२ वाजता कर्जत भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत (NDA’s Victory in Bihar)

या प्रसंगी कर्जत मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, शहराध्यक्ष अमोल भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभय पाटील, संचालक श्रीहर्ष शेवाळे, रामदास मांडगे, भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस विनोद दळवी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष दत्तात्रय नलवडे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील यादव, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, प्रसाद ढोकरीकर, उमेश जेवरे, सतीश पाटील, लालासाहेब शेळके, देविदास खरात, रवि सुपेकर, यशराज बोरा, स्वप्निल तोरडमल, प्रा.शिवाजी धांडे, नवनाथ शिंदे, विठ्ठलराव सोनमाळी, उमेश जपे, राजेंद्र भांड, अक्षय क्षीरसागर, राजेंद्र येवले, रुद्र भिसे, बाबुराव नेटके, निलेश पारखे, ओंकार खराडे आदी उपस्थित होते.