Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे

Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे - गोऱ्हे

0
Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे - गोऱ्हे
Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे - गोऱ्हे

Neelam Gorhe : नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक लाभ देऊन त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले. लाडक्या बहिणींना पैसे उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केले.

Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे
Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे

नक्की वाचा: ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा

महिला मेळाव्यात गोऱ्हे यांनी केले मार्गदर्शन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेतर्फे शहरात गुरुवारी (ता. २२) टिळक रस्ता येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, माजी महापौर शीला शिंदे, नगरसेविका अश्‍विनी जाधव, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख उज्वला भोपळे, शोभा अकोळकर, जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, मीरा शिंदे, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेना शहर प्रमुख महेश लोंढे आदी उपस्थित होते.

Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे
Neelam Gorhe : लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे

अवश्य वाचा: ‘बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’; उद्धव ठाकरेंचा संताप

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, (Neelam Gorhe)

महिलांनी मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग करा. या पैश्‍यातून घरातील आवडीचा वस्तू महिला आपल्या मर्जीप्रमाणे घेऊ शकणार आहे. तर हे पैसे औषधोपचारासाठी किंवा मुलांच्या विविध शैक्षणिक गरजांसाठी उपयोगी पडणार आहे. महिलांचा सन्मान वाढविणारी ही योजना आहे. दिलेले पैसे सरकार परत घेणार नाही, हे पैसे बँकेत सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here