Neelam Gorhe : नगर : महाराष्ट्र विधान परिषद (Legislative Council) उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) नगर दौऱ्यावर असतांना पोलीस (Police) अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत (Law and order) आढावा घेतला.
नक्की वाचा: ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा
लवकर कार्यवाही करावी
लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत देखील सहमती दर्शवली. यासंदर्भात पोलिसांनी लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
अवश्य वाचा: ‘बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’; उद्धव ठाकरेंचा संताप
तालुकास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना (Neelam Gorhe)
नगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी दिली. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील त्याचा उपयोग व्हावा यादृष्टीने आठवड्यातील ठराविक दिवस ऑनलाईन पद्धतीने तालुकास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.