Neeraj Chopra : भारताचा गोल्डनबॉय नीरज चोप्राने पटकावले रौप्यपदक

Neeraj Chopra : भारताचा गोल्डनबॉय नीरज चोप्राने पटकावले रौप्यपदक

0
Neeraj-Chopra

Neeraj Chopra : नगर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भालाफेक स्पर्धेत भारताचा गोल्डनबॉय नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) रौप्यपदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताचं हे पहिलं रौप्यपदक (Silver Medal) आहे. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

89.45 मीटर थ्रो सह रौप्यपदक

अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नांत 92.97 मीटरवर भाला फेकला. नीरज चोप्राने 89.45 मीटर थ्रो सह रौप्यपदक निश्चित केलं. तर ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स याने 88.54 मीटरसह कांस्यपदक पटकावण्यात यश मिळवलं. नीरज चोप्राकडून देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

पाकिस्तानच्या अर्शदला गोल्ड मेडल (Neeraj Chopra)

अर्शद पाकिस्तानसाठी भालाफेकीत वैयक्तिक पदक मिळवणारा पहिला तर एकूण तिसरा खेळाडू ठरला आहे. अर्शदने दुसऱ्याच थ्रोमध्ये ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब विक्रमी थ्रो केला आणि सुवर्ण पदकावरचा दावा भक्कम केला. अखेरपर्यंत अर्शदपेक्षा कोणलाही लांब थ्रो करता आला नाही. यात भारताचा नीरज चोप्राही अपयशी ठरला. त्यामुळे अर्शदला गोल्ड मेडल मिळवण्यात यश आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here