Neeraj Chopra: नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; ८८.१६ मीटर थ्रोसह जिंकली पॅरिस डायमंड लीग

0
Neeraj Chopra :नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; ८८.१६ मीटर थ्रोसह जिंकली पॅरिस डायमंड लीग
Neeraj Chopra :नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; ८८.१६ मीटर थ्रोसह जिंकली पॅरिस डायमंड लीग

नगर : भारताचा अव्वल दर्जाचा भालाफेकपटू (Javelin thrower) व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजने पॅरिस डायमंड लीग २०२५ च्या (Paris Diamond League 2025) विजेतेपदाला गवसणी (Winning the title) घातली आहे. विशेष बाब म्हणजे नीरजने अँडरसन पीटर्स व जूलियन वेबरसारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत केले आहे. या स्पर्धेत नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर भालाफेक करून त्याचं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

नक्की वाचा : आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेदार सुरुवात  

नीरजचा गोल्डन थ्रो! (Neeraj Chopra)

यंदाच्या पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत जूलियन वेबरने नीरजला कडवं आव्हान दिलं होतं. मात्र, नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर भालाफेक करून (थ्रो) त्याचं वर्चस्व सिद्ध केलं. या थ्रोमुळे नीरज सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिला. त्यानंतर त्याचा दुसरा थ्रो ८५. १० मीटरचा होता. मात्र तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फेल ठरला.  मात्र शेवटच्या सहाव्या प्रयत्नात नीरजने ८२.८९ मीटरचा थ्रो नोंदवला आहे.

अवश्य वाचा : अभिनेत्री दीपा परब झळकणार ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटात 

या विजयासह नीरजने जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू जूलियन वेबरचा वचपा काढला आहे. कारण वेबरने डायमंड लीगच्या दोहा लेगमध्ये नीरजला पराभूत केलं होतं. मात्र पॅरिसमध्ये नीरजने वेबरला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत जूलियन वेबरने ८७.८८ मीटर थ्रो करून द्वितीय क्रमांक पटकावला. तर, ब्राझीलच्या लुइस मॉरिसियो दा सिल्व्हाने ८६.६२ मीटरपर्यंत भाला फेकून तिसरं स्थान पटकावलं आहे. मागील तीन स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच नीरजने वेबरचा पराभव केला आहे.

निरंजनी पुढची स्पर्धा कधी ?(Neeraj Chopra)

नीरजची पुढच्या स्पर्धेसाठी २४ जून रोजी ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक २०२५ अॅथलेटिक्स मीटमध्ये मैदानात उतरेल. चेक प्रजास्ताकमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी बंगळुरूत आयोजित एका स्पर्धेत नीरज खेळताना दिसेल.