NEET Exams: नीटच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा;विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क होणार रद्द

नीट परीक्षेतील (NEET Exam) हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली.

0
NEET Exams: नीटच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा;विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क होणार रद्द
NEET Exams: नीटच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा;विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क होणार रद्द

नगर : नीट परीक्षेतील (NEET Exam) हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली. NEET परीक्षा आयोजित करणारी संस्था NTA कडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचप्रकरणी सुनावणी पार पडली.या सुनावणीदरम्यान १५०० हुन अधिक मुलांची फेरपरीक्षा घेण्याचे सुचवण्यात आले आहे. 

नक्की वाचा : ‘मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं’- देवेंद्र फडणवीस

ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द होणार (NEET Exams)

या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, परीक्षा पूर्णपणे रद्द करणं योग्य नाही. त्याचवेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीनं १५०० हून अधिक मुलांची फेरपरीक्षा घेण्याचं सुचवलं आहे. हे लोक पुन्हा परीक्षेला बसले नाहीत, तर ग्रेस नंबर काढून टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो. नीट २०२४ मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ मुलांचे निकाल रद्द करणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं नीट घोळाबाबतच्या सुनावणी दरम्यान दिली आहे. निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, पात्र विद्यार्थ्यांचं काऊन्सिलिंग, प्रवेश प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचंही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

२३ जून रोजी पुन्हा परीक्षा होणार  (NEET Exams)

सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे की, तुमची मागणी एनटीएनं मान्य केली आहे. ते ग्रेस मार्क काढून टाकत आहेत. ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग मिळाले आहेत, तेच पात्र असतील. तसेच, NTA नं सांगितले आहे की, २३ जून रोजी पुन्हा परीक्षा होईल, त्यानंतर समुपदेशन होईल. तिसऱ्या याचिकेतील पेपर लीकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नाही. तसेच, निकाल ३० जूनपूर्वी येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here