Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू

Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू

0
Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू
Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू

Nepal Protests : नगर : नेपाळमध्ये (Nepal) फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर (Social Media) बंदी घालण्यात आलीये. सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळमध्ये आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन (Nepal Protests) सुरु केलं आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये. नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरूणांनी आंदोलन केलं. या आंदोलनात आतापर्यंत 18 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू
Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू

नक्की वाचा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा

शेकडो लोक झाले जखमी

नेपाळमध्ये हजारो मुले-मुली सरकारच्या निषधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. त्याचवेळी, पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांच्या मते, 12 हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला.

Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू
Nepal Protests : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू

अवश्य वाचा : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप

नेपाळ सरकारने म्हटले आहे की, (Nepal Protests)

ठबनावट आयडी असलेले सोशल मीडिया युजर्स द्वेषपूर्ण आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत. याचबरोबर काही प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक आणि इतर गुन्हे करत आहेत. यामुळे सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.”