Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा'ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

0
Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा'ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!
Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा'ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

Nevasa : नेवासा: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) शनिवारी (ता.५) नेवासा (Nevasa) तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद (ZP) व इंग्रजी माध्यमातील शाळेंच्या बालवारकऱ्यांनी पालखी व दिंड्या (Dindi) काढल्या. दरम्यान, या चिमुरड्या बालवारकऱ्यांना दिंड्यांदरम्यान केलेल्या “ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम” व विठ्ठलनामांच्या जयघोषांनी तालुक्यातील बहुतांशी ज्ञानमंदिरांसह गावे दुमदुमली होती. 

Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा'ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!
Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

नक्की वाचा : कोतवाली पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिंड्यांची पर्वणी

आषाढी एकादशी रविवारी आल्याने नेवासा तालुक्यांतील जिल्हा परिषद व इंग्रजी माध्यम शाळांनी आजच (शनिवारी) दिंड्या व पालख्यांचे नियोजन केले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जणू पर्वणी साधून दिंड्या, पालखी काढून भक्तीमय वातावरण निर्माण करत विठ्ठल रुक्मिणी, संत आणि वारकरी वेशातील बालवारकर्‍यांनी शाळा ते गावातून दिंड्या काढल्या होत्या.

Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा'ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!
Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

अवश्य वाचा : आता ‘या’ राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार;सरकारची घोषणा

विठ्ठल-रुख्मीनीमाता चरणी झाडे पावसासाठी प्रार्थना (Nevasa)

दरम्यान, बालवारकऱ्यांच्या शिस्तबध्द व नियोजनबद्ध दिंड्यांनी गावागावातील नागरिकांचे लक्ष वेधले होते. “भरपूर पाऊस पडू दे, सारी जीवसृष्टी आनंदी होऊ दे..अशी प्रार्थना विठ्ठल-रुख्मीनीमाता चरणी करत एकतरी झाड लावू या, जगवू या.. असा संकल्प लोहगाव (पटारे वस्ती) प्राथमिक शाळेच्या बालवारकरी विद्यार्थ्यांनी केला. मृदुंग, टाळ व चिपळ्यांचा नाद आणि शिरावर तुळशी घेतलेल्या मुली, विठ्ठल- रुख्मिनी, संत-वारकर्‍यांचे सजीव देखावे लक्षवेधक ठरत होते.

Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा'ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!
Nevasa : नेवासेत ‘विठ्ठलनामा’ने ज्ञानमंदिरे दुमदुमली!

विद्यार्थ्यांनी विठ्ठल माऊलीच्या गजरात फुगडी, लंगडी, पावली यासह रिंगण सोहळा साजरा केला. आषाढी एकादशीनिमित्त नेवासे फाटा येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलच्या सुमारे सहाशेहून अधिक बालवारकरी विद्यार्थ्यांनी नेवासे शहरातून काढलेल्या दिंडीचे व पालखी पूजन माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या दिंडीत सहभाग घेत बालवारकऱ्यांची रमल्या. मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल, लाठी-काठी, तायक्वांदो, पथसंचलन, पावली नृत्य आणि घोडा मिरवणूक सादर करून उपस्थितांची मने जिंकली