Nevasa : नेवासा येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी बंदला १०० टक्के प्रतिसाद

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ नेवासा येथे सुरू असलेल्या आमरण साखळी चक्री उपोषणाच्या पाचव्या दिवशी बुधवारी दि. १ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या नेवासा शहर बंद ला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

0
238

वारकऱ्यांनी भजने गाऊन दिला पाठिंबा

नेवासा : सकल मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ नेवासा (Nevasa) येथे सुरू असलेल्या आमरण साखळी चक्री उपोषणाच्या पाचव्या दिवशी बुधवारी दि. १ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या नेवासा शहर बंद ला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. यामध्ये साखळी उपोषण, बंद, रास्ता रोको अश्या विविध प्रकारे उपोषणाला पाठिंबा दिला जात आहे. विशेष म्हणजे अनेक समाजामधून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. यावेळी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी उपोषणस्थळी भजने गाऊन उपोषणाला पाठिंबा दिला.

नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठी माजी सैनिकाच्या पत्नीचा आत्महत्येचा इशारा

   नेवासा येथे सकल मराठा बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून जेष्ठ विधी तज्ञ ॲड. के. एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, संदीप आलवणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस होता. यावेळी नेवासा येथील हनुमान भजनी मंडळाच्या सेवेकऱ्यांनी भजने गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ नेवासकरांनी व व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेऊन सदरचा बंद १०० टक्के यशस्वी केला. मुख्य पेठेसह श्रीरामपूर रोड रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता विशेष म्हणजे या बंद ला सर्वधर्मीय व्यापारी वर्गाने स्वयंफुर्तींने बंद ठेवून आरक्षण प्रश्नांवर उपोषणस्थळी जाऊन सहभाग नोंदवला व पाठिंबा जाहीर केला. यामध्ये सुवर्णकार समाज,जैन समाज,मुस्लिम,तैलिक  समाज यांनी पाठिंबा देऊन उपोषणात सहभाग नोंदवला.

हे देखील वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय; मनाेज जरांगेंची नाव न घेता सडकून टीका

     प्रांताधिकारी सुधीर पाटील, नेवासा तालुक्याचे तहसीलदार डॉ.संजय बिरादार,जिल्हा परिषदेचे अर्थ विभागाचे सभापती सुनीलभाऊ गडाख,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे केंद्रीय मार्गदर्शक हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी गायनाचार्य हरी महाराज भोगे, गोणेगाव चौफुला येथील विद्यार्थी तसेच नेवासा येथील हनुमान भजनी मंडळाच्या सेवेकऱ्यांनी भजने गाऊन मराठा आरक्षणच्या मागणीला पाठिंबा दिला.तालुक्यातुन रोज दोन गावातील मराठा आंदोलक उपोषण स्थळी येऊन साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती उपोषणकर्ते अँड.के.एच.वाखुरे यांनी दिली.