Nevasa : नेवासा : सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी नेवासा (Nevasa) सकल जैन समाजाच्या (Total Jain Society) वतीने नेवासा शहरात जैन धर्माच्या (Jainism) पवित्र जिनेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणूक व दिंडी सोहळ्याचे करण्यात आले होते.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
प्रवीणऋषी महाराज यांच्या प्रेरणेने ग्रंथ मिरवणूक
दरम्यान, यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजराने व भगवान महावीर स्वामीजींच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य उपाध्याय प्रवीणऋषी महाराज यांच्या प्रेरणेने नेवासा शहरातील जैन समाजाचे वतीने काढण्यात आलेल्या जिनेश्वरी ग्रंथ मिरवणूक व दिंडी सोहळ्याची शहरातील श्रीरामपूर रोडवरील जैन मंदिर येथून प्रारंभ झालेली मिरवणूक खोलेश्वर गणपती, बस स्टँड, सदाशिव नगर ते नियोजित जैन स्थानक अशी काढण्यात आली.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
शेकडो जैन बंधू-भगिनी सहभागी
मिरवणुकीत शहरासह तालुक्यातील शेकडो जैन बंधू-भगिनी सहभागी झाले होते. जिनेश्वरी ग्रंथ मिरवणूक व दिंडी सोहळ्याप्रसंगी मोहनलाल चोरडिया, मोहनलाल मुनोत, सूर्यकांत गांधी, सुभाष कडू, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष औस्तवाल, रत्नमाला विठ्ठलराव लंघे, अमृता नळकांडे, डॉ. मनीषा वाघ, प्रा . सतीश मुळे, सुनिल शिंगवी, प्रकाश गुंदेचा, जयकुमार गुगळे, अभय बलाई, संतोष शिंगी, विजय चोरडिया, विशाल शिंगवी, निखिल शिंगवी, कमलेश ओस्तवाल, राजेंद्र मुथा यांच्यासह असंख्य जैन बांधव उपस्थित होते.



