
New Delhi Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या (New Delhi Railway Station) १४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) १८ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. या घटनेनंतर आता प्लॅटफॉर्म तिकिटांची (Platform tickets) काउंटर विक्री बंद (Counter sales closed) करण्यात आली आहे. हा आदेश २६ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. चेंगराचेंगरी नंतर एनडीएलएस वर कोणतेही प्लॅटफॉर्म तिकीट दिले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. फलाटावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. तसेच नवी दिल्ली स्थानकावर रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नक्की वाचा : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स ‘या’ तारखेला पृथ्वीवर येणार
गर्दी व्यवस्थापनासाठी सहा अधिकारी तैनात (New Delhi Stampede)

प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये,यासाठी प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर आरपीएफ आणि टीटी तैनात करण्यात आले आहेत.या आदेशानंतर आता तुमच्याकडे जनरल तिकीट किंवा आरक्षित तिकीट असेल तरच तुम्ही प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी सहा निरीक्षक दर्जाचे अधिकारी तैनात केले होते. यातील काही अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली रेल्वे पोलिस ठाण्यात एसएचओ पदावर काम केले आहे.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
चेंगराचेंगरीची घटना नेमकी कशी घडली ?(New Delhi Stampede)
शनिवारी (ता.१५) नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर भाविकांची मोठी गर्दी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होती. इतर प्रवासीही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रेल्वेने अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून विशेष ट्रेन येण्याची घोषणा केली होती. यानंतर आधीच फलाट १४ वर जाण्याच्या प्रयत्नात असलेले प्रवासीही घोषणा होताच फलाट १६ च्या दिशेने धावले, त्यामुळे गोंधळ झाला आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. लोक एकमेकांवर तुटून पडू लागले. ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारण बनली. या चेंगराचेंगरीत १८जणांचा मृत्यू झाला, त्यात ९ पुरुष, ८ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे.