नगर : ‘धर्मवीर-२’ (Dharmveer 2) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याअगोदर रिलीज झालेल्या धर्मवीरने चांगलीच प्रसिद्धी मिळविली आहे. आता ‘धर्मवीर-२ चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर आली आहे. ‘धर्मवीर-२’ या चित्रपटाचा नवा ट्रेलर (New Trailer) समोर आला असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर (Relese Date) करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे.
नक्की वाचा : अभिनेता गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या भूमिकेत दिसणार
‘धर्मवीर २’ चा नवा ट्रेलर प्रदर्शित (Dharmaveer 2 )
‘धर्मवीर २’ चित्रपटाचा नवाकोरा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यामध्ये ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब दिसत आहेत.या चित्रपटात आनंद दिघेंच्या जीवनातील आणखी पैलू उलगडणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर मुळे अंगावर अक्षरशः काटा येत आहे. दिघे साहेबांची विविध रुपं या चित्रपटातून दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघे साहेब या चित्रपटातील गाण्यात दिसतात. त्याशिवाय यात हिंदुत्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याच कुतुहल निर्माण झाले आहे.
अवश्य वाचा : लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका;गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका
प्रवीण तरडे यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Dharmaveer 2)
“धर्मवीर -२” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘धर्मवीर -२’ चित्रपटाच्या या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर, ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही गाजत आहेत. त्यानंतर आता आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी “धर्मवीर -२” मधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.