New Voting Rules: महापालिका निवडणुकीत ४ EVM वर मतदान करावे लागेल!पूर्ण मतदान कसं करायचं?

0
New Voting Rules: महापालिका निवडणुकीत ४ EVM वर मतदान करावे लागेल!पूर्ण मतदान कसं करायचं?
New Voting Rules: महापालिका निवडणुकीत ४ EVM वर मतदान करावे लागेल!पूर्ण मतदान कसं करायचं?

नगर : यंदाची महानगरपालिका निवडणूक (Municipal Corporation Election) सगळ्यांसाठी खूप वेगळी असणार आहे. कारण मतदानाची पद्धत (Voting Method) बदलली आहे आणि नियमही बदलले (New Voting Rules) आहेत. आता तुम्हाला चार EVM वर मतदान करावं लागणार आहे. मुंबई वगळता २८ महापालिकांमध्ये निवडणूक बहुसदस्य पद्धतीने होणार आहे. एका प्रभागातून एक नाही तर ४ नगरसेवक निवडले जाणार आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक मतदाराला चार मतं द्यावी लागणार आहे. मुंबई वगळता राज्यातील २८ महापालिकांमध्ये आता ‘बहुसदस्य पद्धत’ लागू झाली आहे. म्हणजेच आता तुमच्या एका प्रभागातून आता एक नाही, तर तब्बल ४ नगरसेवक (Councilor) निवडले जाणार आहेत.

नक्की वाचा:  ‘एकदिवस हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल’;असदुद्दीन ओवैसी यांचं सोलापुरात वक्तव्य

मतदान प्रक्रिया कशी असेल ? (New Voting Rules)

जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाणार तेव्हा तिथे तुम्हाला तुमच्या प्रभागानुसार २ किंवा ४ EVM मशिन दिसतील. प्रत्येक जागेसाठी एक ठराविक रंग निश्चित करण्यात आला आहे.

जागा ‘अ’ साठी: पांढरा रंग

जागा ‘ब’ साठी: फिक्कट गुलाबी रंग

जागा ‘क’ साठी: फिक्कट पिवळा रंग

जागा ‘ड’ साठी: फिक्कट निळा रंग

  असे रंग आपल्याला गटानुसार दिसणार आहेत.

अवश्य वाचा: ‘मी कोण आहे हे जनता ठरवेल’;महेश लांडगेंच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर 

मतदान प्रक्रिया पूर्ण कशी कराल? (New Voting Rules)

या सर्व मशिनवर तुम्हाला एक एक बटन दाबायचे आहे. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना देखील मतदान करू शकता, किंवा कुणालाच मतदान करायचं नसेल तर नोटाचं बटन देखील दाबू शकता. मात्र चार पैकी जर तुम्ही एकाही मशिनवर मतदान केलं नाही, तर तुमचं मतदान अपूर्ण राहणार आहे. यावेळी तुम्हाला एक तांत्रिक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मशिनवर मतदान केल्यावर फक्त लाल दिवा लागेल. कोणताही आवाज येणार नाही. जेव्हा तुम्ही चौथ्या आणि शेवटच्या मशिनवर बटण दाबाल, तेव्हाच ‘बीप’ असा आवाज येईल. तो आवाज आला की, समजायचं तुमचं मतदान पूर्ण झालं आहे. अश्या पद्धतीने तुम्ही मतदान प्रक्रियेला सामोरं जाऊ शकाल.