New Zealand Vs South Africa | भारत-न्युझीलँड यांच्यात होणार अंतिम सामना; दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

0
New Zealand Vs South Africa
New Zealand Vs South Africa

New Zealand Vs South Africa | नगर : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज (ता. ५) न्युझीलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका(New Zealand Vs South Africa) असा उपांत्यफेरीचा सामना झाला. या सामन्यात न्युझीलँडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्युझीलँड संघात रविवारी (ता. ९) दुपारी अडीच वाजता दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे.

नक्की वाचा : धनंजय मुंडे यांना क्लीनचिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची भावना बदलली  

न्युझीलँडचा धावांचा डोंगर (New Zealand Vs South Africa)

न्युझीलँडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३६२ धावांचा डोंगर उभा केला. न्युझीलँडच्या भक्कम फलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा तोफखाना निष्प्रभ ठरला. दक्षिण आफ्रिकेने न्युझीलँडचा आक्रमक सलामीवीर विल यंग याला झटपट बाद केले. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र (१०१ चेंडूत १०८ धावा) व केन विल्यमसन (९४ चेंडूत १०२ धावा) या जोडीने न्युझीलँडची भक्कम धावसंख्या उभी केली. या शिवाय डॅरिल मिचेल व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी न्गिदीने तीन, कागिसो रबाडाने दोन तर वियान मल्डरने एक फलंदाज बाद केला.

अवश्य वाचा :आदर्श शिंदे म्हणतोय ‘वढ पाचची’;आरडी चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित  

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद (New Zealand Vs South Africa)

न्युझीलँडच्या भेदक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज क्रमा क्रमाने बाद होत राहिली. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली. डेव्हिड मिलरने नाबाद १०० धावा, रेसी व्हान देर दुस्सेनने ६९ धावा व कर्णधार टेंबा बवुमाने केलेल्या ५६ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ ५० षटकांत नऊ गडी गमावत ३१२ धावाच जमवू शकला. न्युझीलँडकडून मिचेल सँटनरने तीन तर ग्लेन फिलिप्स व मॅथ्यू हेन्रीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. न्युझीलँडचा रचिन रवींद्र सामन्याचा मानकरी ठरला. भारत व न्युझीलँड या संघात अंतिम सामना होणार आहे. फिरकी गोलंदाजी हे भारतीय संघाचे बलस्थान आहे. न्युझीलँडचे फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकतात. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल, अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here