Newasa | नेवासा: संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा (Newasa) येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात कामिका एकादशीनिमित्त सुमारे सहा लाखाहून अधिक भाविकांनी ‘पैस’ खांबांचे दर्शन घेतले. सोमवारी पहाटेपासून नेवासा शहरासह तालुक्यातील रस्ते दिंड्यांतील वारकर्यांच्या “ज्ञानोबा माऊली.. तुकाराम…”च्या जयघोषाने दुमदुमले होते.
‘पैस’चे दर्शन (Newasa)
यंदा माऊली भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. दरम्यान, श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी एकादशीच्या पूर्वसंध्येला तर सोमवारी (ता.२१) देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरी महाराज, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पंचगंगा समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, ज्ञानेश्वरचे प्राचार्य डॉ. अरुण घनवट यांनी ‘पैस’चे दर्शन घेतले.
अवश्य वाचा – अहिल्यानगरच्या डॉ. सिमरनकौर वधवा यांनी प्रवाशाला विमानात दिली वैद्यकीय मदत
दर्शनासाठी मोठी गर्दी (Newasa)
संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मुखदर्शन व बारीची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसर रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर विविध दुकाना थाटल्या होत्या. नेवासे फाटा, नेवासे शहर ते ज्ञानेश्वर मंदिर असे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे संत एकनाथ महाराजांचे वंशज डॉ. मेघश्याम महाराज, प्राजक्ता व ज्ञानराज महाराज, राजवर्धन महाराज आणि विश्वस्त कैलास जाधव यांचे हस्ते ‘पैस’ खांबाची विधिवत पुजन करून जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ विश्वस्त विश्वासराव गडाख, ज्ञानेश्वर माऊली शिंदे आदींच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून जलाभिषेक घालण्यात आला.