Newasa AAP : नेवासेत ‘आप’च्या असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

  नगर पंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात नेवासा आम आदमी पार्टीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या असहकार आंदोलनास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

0
नेवासेत 'आप'च्या असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा:  नगर पंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात नेवासा (Newasa) आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) वतीने सुरू करण्यात आलेल्या असहकार आंदोलनास (Non Cooperation Movement) ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘आप’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात फिरून कर न भरण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली. 

नक्की वाचा : शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा; शासन देणार आता ई-शिधापत्रिका

नेवासा नगर पंचायत नागरिकांकडून मालमत्ता, पाणी, स्वच्छ्ता, आरोग्य, शिक्षण, रस्ते आदी मूलभूत तसेच पायाभूत सुविधा देण्याच्या बदल्यात विविध प्रकारचे कर वसूल करते. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही सुविधा देत नसल्याचा आरोप ‘आप’च्या वतीने नगर पंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला. पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे दोन कळीचे मुद्दे बनल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

अवश्य वाचा : दोघांच्या भांडणात पोलिसांना मार

पौराणिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक महत्त्व असलेल्या नेवासा शहराला शुद्ध, मुबलक पाणी पुरवठा हे तर एक दिवा स्वप्न ठरण्याची चिन्हे दिसू लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नगर पंचायत प्रशासनाच्या स्वच्छतेबाबतच्या उपाययोजना पुरेशा नसल्याने शहराला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधून पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर दरवर्षी होत असलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च कागदावरच राहत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

तालुक्याचे ठिकाण असलेल्या नेवासा शहरात रविवार आठवडे बाजारातून मोठा महसूल मिळत असतानाही बाजारकरुंना अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात वावरावे लागत असल्याची बाब नेवासा ‘आप’ने निदर्शनास आणून दिली आहे. पौराणिक, अध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या शहरात महिला तसेच पुरुषांसाठी साधी स्वच्छ्ता गृहाची व्यवस्था करण्यात अपयश आल्याचा टोला यावेळी लगावण्यात आला आहे. नगर महापालिकेच्या धर्तीवर शास्ती करात सवलत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या शास्तीतील दाखविण्यात आलेली एक टक्के रक्कम वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर तसेच दोन टक्के रक्कम अग्निशमन व्यवस्थापनावर खर्च करण्याचे दाखविण्यात आलेले कारण ही नगर पंचायत प्रशासनाची निव्वळ बनवाबनवी असल्याचा सनसनाटी आरोप करण्यात आला आहे.

नगर पंचायत प्रशासन शहर परिसरात कुठेही वृक्षारोपण करत नसताना तसेच अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नसताना सुमारे तीन टक्के रक्कम ही निव्वळ फसवणूक करून वसूल केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. थकीत करांवर केली जाणारी २४ टक्के व्याज आकारणी ही अवास्तव तसेच निव्वळ मनमानी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत नगर पंचायत प्रशासन शहरात मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करत नाही,तोपर्यंत नागरिक तसेच व्यावसायिकांनी कुठलेही कर देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी ‘आप’चे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, ॲड.सादिक शिलेदार, संदीप आलवणे, सलीम सय्यद, विठ्ठल मैंदाड, करिम सय्यद, देवराम सरोदे, किरण भालेराव, प्रवीण तिरोडकर, बाळासाहेब साळवे, अनिल तांदळे, अण्णा लोंढे, बापूसाहेब अढागळे, अय्युब पठाण आदी या असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here