Nikhil Wagle : पुण्यानंतर आता ‘निर्भय बनाे सभेचे’ नगरमध्ये आयाेजन; निखिल वागळेंची तोफ धडाडणार

Nikhil Wagle : पुण्यानंतर आता 'निर्भय बनाे सभेचे' नगरमध्ये आयाेजन; निखिल वागळेंची तोफ धडाडणार

0
Nikhil Wagle

Nikhil Wagle : नगर : पुण्यानंतर आता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांची तोफ नगरमध्ये धडाडणार आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) विविध ठिकाणी निर्भय बनोच्या (Nirbhay Bano) जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. ९ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी सभेला विराेध करीत हल्ला केला होता. त्यानंतर आता येत्या मंगळवार (ता. २०) फेब्रुवारीला वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. नगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

हे देखील वाचा: मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा

संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट (Nikhil Wagle)

नगरमध्ये माऊली सभागृह येथे मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार आहे. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सभा आयोजनाबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, दीपक ससाणे, सुजित क्षेत्रे, देवराम शिंदे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला आदींनी दिली आहे. संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले. सामाजिक कार्यकर्त्या नीशा शिवूरकर (संगमनेर) देखील सभेला संबोधित करणार आहेत.

नक्की वाचा: नगरमधील साडेबारा एकर भूखंडाला आणखी वेगळे वळण

स्वायत्त संस्थांचा राजकीय हेतूने गैरवापर (Nikhil Wagle)

देशात आणि राज्यात हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. निवडणूक आयोग, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा राजकीय हेतूने गैरवापर सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, धार्मिक, जातीय तेढ यामुळे जनता त्रस्त आहे. शेतकरी, कामगार, लघू उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता सर्वच देशोधडीला लागले आहेत. त्यातच नगरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुंडगिरी, खून, गोळीबार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, झूंडशाही, लोकशाही विचार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले अशा हिंसक घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र नाहक होरपळून निघत आहे. हुकूमशाहीला विरोध आणि लोकशाही वाचविण्यासाठीचा लढा जन सहभागाने पुढे नेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आल्याचे मंचाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here