Nikita Porwal: फेमिना मिस इंडिया (Femina Miss India) ही भारतातली प्रतिष्ठेची सौंदर्यस्पर्धा आहे. या सौंदर्यस्पर्धेची नुकतीच मुंबईत (Mumbai) सांगता झाली. या स्पर्धेत मध्य प्रदेशच्या निकिता पोरवालने (Nikita Porwal) यंदाचा ‘मिस इंडिया’ होण्याचा बहुमान पटकावला आहे. तर,केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारी रेखा पांडे ही उपविजेती ठरली.
नक्की वाचा : ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर खूप उठा-बशा’-जयंत पाटील
निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब (Nikita Porwal)
मुंबईत वरळी येथे आयोजित बुधवारी (ता.१७) झालेल्या फेमिना मिस इंडिया २०२४ च्या स्पर्धेत निकितानं मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर तिच्यावर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. या स्पर्धेत दादर नगर हवेलीची रेखा पांडे फर्स्ट रनर अप तर गुजरातची आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली. फेमिना मिस इंडिया २०२३ ची विजेती नंदिनी गुप्तानं निकिताच्या डोक्यावर मुकुट सजवला. याशिवाय नेहा धुपियानं तिला मिस इंडिया सॅश घालून दिले. तसेच या कार्यक्रमात अभिनेत्री संगीता बिजलानीनं परफॉर्मन्ससह रॅम्प वॉक केला. फेमिना मिस इंडिया २०२४ च्या कार्यक्रमात राघव जुयाल आणि इतर अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर दिसले.
अवश्य वाचा : ‘आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून आणा’-प्रकाश आंबेडकर
निकिता पोरवाल कोण आहे ?(Nikita Porwal)
निकिता पोरवालने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही अँकर म्हणून केली. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. आतापर्यंत ६० हून अधिक नाटकांमध्ये तिने काम केलंय. विशेष बाब म्हणजे ‘कृष्ण लीला’ हे २५० पानी नाटकसुद्धा तिने लिहिलं आहे. याशिवाय निकिताच्या एका चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्क्रीनिंग पार पडलं आहे. लवकरच हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. निकिताने आपलं सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली. याचा तिच्या कुटुंबाला प्रचंड अभिमान वाटत आहे.