Nilesh Lanke : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही

Nilesh Lanke : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही

0
Nilesh Lanke

Nilesh Lanke : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आज सकाळपासून येत होत्या. यावर आमदार लंके यांनी आज दुपारी नगर शहरातील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ‘अजून काही ठरलं नाही,’ असे म्हणत आपली भूमिका अलगत गुलदस्त्यात ठेवली.

हे देखील वाचा : लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका

लंके व खासदार कोल्हे यांच्या भेटीचे व्हिडिओ व्हायरल (Nilesh Lanke)


आमदार लंके यांनी मागील आठवड्यात नगर शहरात शिवपूत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले होते. हे महानाट्य शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तयार केले होते. यात त्यांची भूमिकाही होती. या महानाट्यासाठी नगरमध्ये आलेल्या खासदार कोल्हे यांनी ‘आमदार लंकेंनी शरद पवार गटात दाखल व्हावेत,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. तत्पूर्वीही आमदार लंके हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. आमदार लंके हे आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्ष प्रवेश करतील, अशा बातम्या सुरू झाल्या. या बातम्यांवर शरद पवार यांनी कोणताही पक्ष प्रवेश होत नसल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यानंतर आमदार लंके व खासदार कोल्हे यांच्या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चेला उधान आले.

नक्की वाचा : ‘फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका’ – मनोज जरांगे

आमदार लंके यांनी पत्रकार परिषदेत केले स्पष्ट (Nilesh Lanke)


आमदार लंके यांनी दुपारी त्यांच्या नगर येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी स्पष्ट केले की, महानाट्याच्या वेळी मिळालेला लोकांचा सहभाग पाहून खासदार कोल्हे यांनी मला शरद पवार गटात यावे असे सांगितले होते. मात्र, अजून काही ठरलं नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात भविष्यावर बोलण्यात अर्थ नसतो. राजकारणात आत्ता दिसणारे चित्र क्षणार्धात बदलू शकते. मला लोक संपर्क वाढविण्याचा छंद आहे. त्यामुळे माझा कार्यक्रम व इतर कामा निमित्ताने जिल्हाभर संपर्क आहे. जिल्ह्याबाहेरही माझा संपर्क आहे. याचा अर्थ मी तिथे निवडणूक लढणार असा होत नाही. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची महत्त्वाकांक्षा असते. पक्ष देईल ती जबाबदारी कार्यकर्त्या पार पाडावी लागते.  महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ स्थरावरील आहे. मी पक्षाचा शेवटचा घटक आहे. त्यामुळे यावर मी काय बोलणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


मी आज आजारी आहे. मी गाडीत झोपलो होतो. तुम्ही जीवाभावाचे भेटायला आले म्हणून मी बोलत आहे. माझा काल वाढदिवस असल्याने आज पहाटे साडेपाच पर्यंत लोक मला शुभेच्छा देत होते. त्यामुळे अती जागरणाने माझी तब्येत बिघडली आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या मेळाव्या विषयी मला माहिती नाही. या बाबत मला कुणाला तरी विचारावे लागेल. मला मेळाव्याचीच माहिती नाही त्यामुळे पक्ष प्रवेशाचा संबंध येत नाही. माझा पक्ष प्रवेशाची बातमी अफवा आहे. मी पुण्यात जेथे होतो. त्या बाजूच्याच रेस्टहाऊसमध्ये खासदार कोल्हे आले होते. म्हणून मी त्यांना अनौपचारीक भेटलो. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here