Nilesh Lanke : खासदारांवर बाेलण्याची आपली लायकी नाही; निलेश लंके समर्थकांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर हल्लाबाेल 

Nilesh Lanke : खासदारांवर बाेलण्याची आपली लायकी नाही; निलेश लंके समर्थकांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर हल्लाबाेल 

0
Nilesh Lanke : खासदारांवर बाेलण्याची आपली लायकी नाही; निलेश लंके समर्थकांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर हल्लाबाेल 
Nilesh Lanke : खासदारांवर बाेलण्याची आपली लायकी नाही; निलेश लंके समर्थकांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर हल्लाबाेल 

Nilesh Lanke : नगर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) ज्यांना भाजपचे (BJP) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांना स्वतःच्या गावात मताधिक्य देता आले नाही, त्या भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर टीका करण्याची लायकी नसल्याचे प्रत्युत्तर त्यांच्याच गावातील लंके समर्थकांनी दिले आहे.

अवश्य वाचा: जिल्हादंडाधिकाऱ्यांचे १२ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

भालसिंग यांच्यावर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुुहासराव कासार, पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजीराव कासार, उपसरपंच दादासाहेब कासार, सामाजिक कार्यकर्ते गुंडा भाऊ जासूद, अरूण कासार, ग्रामपंचायत सदस्य विकास कासार, सागर कासार, संदीप बोठे, डॉ. राजू बोठे, बंटी शेख, शिवसेना नेते अप्पा भालसिंग, संजय भालसिंग यांनी भालसिंग यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांना चांगलेच सुनावले आहे.

नक्की वाचा: शालिनी विखे पाटलांचे पांडुरंगाला साकडे; पाऊस पडू दे.. शेतकरी सुखी होऊ दे.. संकटे दूर कर

वाळकी गावातूनच विखेंना मताधिक्य देता आले नाही (Nilesh Lanke)

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भाजप जिल्हाध्यक्षांचा पायगुण असा आहे की, त्यांच्या विद्यामान खासदारांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना त्यांच्या वाळकी गावातूनच विखे यांना मताधिक्य देता आले नाही. भालसिंग साहेब अगोदर तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवा, ग्रामपंचायत सदस्य व्हा, मगच अशी मुक्तफळे उधळा. खासदारांवर बोलण्याची आपली लायकी नाही. आपली क्षमता  काय ? आपण बोलता काय? असे प्रश्‍न या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळातही तुम्ही अनेकदा टीका केली, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले.  याचा अर्थ आम्ही काही बांगडया भरलेल्या नाहीत, हे लक्षात ठेवा, अशी जाणीवही निवेदनात करून देण्यात आली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अमूलच्या माध्यमातून जसा तुम्ही गुजरातचा उदो उदो करत आहात. त्याच गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दुधाला भाव का नाही, याचेही उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असताना तुम्ही पराभूत झालेल्या विखे पाटलांची तळी उचलायला निघालात, हे हास्यास्पद आहे. स्वयंघोषीत कोण आणि लोकनेता कोण हे नगर दक्षिण मतदारसंघातील मतदारांनी महिन्यापूर्वीच मतपेटीतून दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला, कांद्याला भाव मिळत नसेल, तर त्याविरोधात आवाज उठविणे हे लोकपतिनिधीचे कर्तव्य असते. मात्र, तुम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुखः दुःखात सहभागीच झाला नाहीत. तेव्हा तुम्हाला वेदना कशा कळणार ? शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तुमच्या तत्कालीन खासदाराने किती आंदोलने केली? संसदेत किती वेळा आवाज उठविला? याचा अभ्यास भालसिंग यांनी करावा. खासदार लंके यांनी आंदोलन करून सरकारच्या नाकीनऊ आणल्यामुळे पायाखालची वाळू सरकलेले भालसिंग बरळू लागले आहेत. गुजरातमधील अमूल हा ब्रँड कोणी विकसीत केला, याची माहीतीही नसलेल्या भालसिंग यांनी विखे यांची मर्जी सांभाळण्यासाठी अशी नौटंकी करू नये, असा सल्लाही या निवेदनात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here