Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक खासदार झाल्यानंतर प्रथमच विधानभवनात

Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक खासदार झाल्यानंतर प्रथमच विधानभवनात

0

खासदार शरद पवार यांचीही घेतली भेट

Nilesh Lanke : नगर : विधानसभा (Assembly) सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवून विजय संपादन केलेल्या खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी बुधवारी विधानभवनात जाऊन ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. दरम्यान, मुंबई दौऱ्यादरम्यान खासदार लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक खासदार झाल्यानंतर प्रथमच विधानभवनात
Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक खासदार झाल्यानंतर प्रथमच विधानभवनात

अवश्य वाचा: सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण; दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर…

याच पवित्र मंदीराने काम करण्यासाठी ताकद दिली

विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार लंके म्हणाले, सन २०१९ मध्ये विधानसभेचा सदस्य म्हणून मी प्रथम विधानभवनामध्ये पहिले पाऊल टाकले. गेल्या साडेचार वर्षात या विधानभवनामध्ये अतिशय चांगले अनुभव आले. समाजाची सेवा करण्याची संधी मला माझ्या मायबाप जनतेने दिली. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मी याच विधानभवनामध्ये निश्‍चितपणे केला. साडेचार वर्षात समाधानकारक काम केल्यानंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढविली, खासदार होउन पहिल्यांदाच विधानभवनात आलो. याच पवित्र मंदीराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर ताकद दिली, प्रेरणा दिली त्यामुळे मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याची प्रतिक्रीया खासदार लंके यांनी दिली.

नक्की वाचा: नगरसह विविध शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Nilesh Lanke)

खासदार लंके यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगेश मते, भुषण शेलार, दादा दळवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here