Nilesh Lanke : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल 

Nilesh Lanke : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल 

0
Nilesh Lanke : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल 
Nilesh Lanke : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल 

Nilesh Lanke : पारनेर : मुख्यमंत्री (Chief Minister) वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मतदारसंघासह राज्यातील गरजू रूग्णांना मदत मिळवून देण्यात राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे यंदाही अव्वल ठरले आहेत. १ जुलै २०२२ ते १ जुलै २०२४ या कालावधीमध्ये खासदार लंके यांनी विविध आजारांनी त्रस्त असलेल्या १४९ रूग्णांना (Patients) १ कोटी १५ लाख ७२ हजार रूपयांची मदत मिळवून दिल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे (Medical Help) विशेष कार्य अधिकारी मंगेश  चिवटे यांनी दिली. गेल्या वर्षीही खासदार लंके यांनी विविध रूग्णांना सर्वाधिक मदत मिळवून दिली होती.

नक्की वाचा: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर

रूग्णास वैद्यकिय मदत मिळवून दिली जाते

सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणाऱ्या खासदार लंके यांच्याकडे दररोज विविध प्रकारच्या  मदतीसाठी राज्यभरातून लोक येतात. विविध आजारांवरील उपचारासाठी रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आल्यानंतर मदतीसाठी सुरूवातीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा विचार केला जातो. या योजनेमध्ये संबधित रुग्णाचा आजार बसत नसेल तर विविध धर्मदाय रूग्णालयांशी संपर्क करून त्या रूग्णास वैद्यकिय मदत मिळवून दिली जाते. मतदारसंघाबरोबरच विविध जिल्हयातून खासदार लंके यांच्याकडे लोक मदत मागण्यासाठी येतात. खासदार लंके हे त्यांचे सर्व कसब पणाला लावून सबंधित रूग्णास मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.

अवश्य वाचा: माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

पारनेर येथील संपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन (Nilesh Lanke)

विविध रूग्णांना वैद्यकिय मदत मिळवून देण्यासाठी खासदार लंके यांच्या पारनेर येथील संपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून या कक्षाचे प्रमुख अनिल चौधरी हे विविध आजारांचे वर्गीकरण करून ते प्रस्ताव सबंधित विभागाकडे पाठवितात. प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून मदत मंजूर झाल्याची माहिती दिली जाते. संबंधित मदतीची रक्कम थेट त्या रुग्णालयाच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येते.


सन २०१९ मध्ये आमदार म्हणून तर सन २०२४ मध्ये खासदार म्हणून मायबाप जनतेने मला निवडूण दिले. ही पदे मिरवण्यासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे माझ्याकडे मदतीसाठी आलेल्या व्यक्तीची, त्याच्या नातेवाईकाची तो कोणत्या पक्षाचा, पार्टीचा अथवा मतदारसंघातील अथवा मतदारसंघाबाहेरील आहे, याची कधीही चौकशी केली नाही. माझ्या परीने मी प्रत्येकाला मदत करण्याचा आजवर  प्रयत्न  केला. मुख्यमंत्री सहाय्यता  कक्ष तसेच इतर धर्मदाय रूग्णालयांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रूग्णांना कशी मदत मिळेल, याची मी व माझे सहकारी दक्षता घेतात. यापुढील काळातही ही सेवा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here