Nilesh Lanke : निवडणुकीत तर हरवलं आता काेर्टातही तेच हाेईल; लंकेंची नाव न घेता विखेंवर टीका 

Nilesh Lanke : निवडणुकीत तर हरवलं आता काेर्टातही तेच हाेईल; लंकेंची नाव न घेता विखेंवर टीका 

0
Nilesh Lanke : निवडणुकीत तर हरवलं आता काेर्टातही तेच हाेईल; लंकेंची नाव न घेता विखेंवर टीका 
Nilesh Lanke : निवडणुकीत तर हरवलं आता काेर्टातही तेच हाेईल; लंकेंची नाव न घेता विखेंवर टीका 

Nilesh Lanke : नगर : अहमदनगर लाेकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला महायुतीचे पराभूत उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

नक्की वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल

लंके म्हणाले

”संसदीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडत असतात. या प्रक्रियेत कुणाचा तरी पराभव होणार हे निश्चित आहे. पण आपण आपला पराभवच होऊ शकत नाही, अशी मानसिकता बाळगणे ही हुकूमशाही प्रवृत्ती आहे. या मानसिकतेतूच समोरचे पराभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग, तर कधी हायकोर्टात जाताना दिसत आहेत. अर्थात हे त्यांना कायद्याने उपलब्ध करुन दिलेले मार्ग आहेत. हे मार्ग तपासून जर त्यांना मनःशांती लाभत असेल, तर त्यांना जे काय करायचं करु द्या.

अवश्य वाचा: कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

आपली बाजू सत्याची (Nilesh Lanke)

आपली बाजू सत्याची आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो, हे ते कदाचित विसरलेले असावेत. ते सध्या खेळ खेळायचा प्रयत्न करीत आहेत, पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत. निवडणूक झाली, विरोध संपला. विधायक मार्गाने आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ, ही आपली भूमिका आहे, पण त्यांना खेळच करायचा असेल, तर आपणही व्यवस्थितपणे खेळू. निवडणुकीत तर हरवलं  आहे, कोर्टातही तेच होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here