Nilesh Lanke : आता मी राहात्यामध्येच जाऊन बसणार; खासदार निलेश लंके यांचे विखेंना आव्हान

Nilesh Lanke : आता मी राहात्यामध्येच जाऊन बसणार; खासदार निलेश लंके यांचे विखेंना आव्हान

0
Nilesh Lanke : आता मी राहात्यामध्येच जाऊन बसणार; खासदार निलेश लंके यांचे विखेंना आव्हान
Nilesh Lanke : आता मी राहात्यामध्येच जाऊन बसणार; खासदार निलेश लंके यांचे विखेंना आव्हान

Nilesh Lanke : पारनेर : आता मी राहात्यामध्येच जाऊन बसणार आहे, असे सांगत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना वाडेगव्हाण येथून थेट आव्हान दिले. वाडेगव्हाणच्या मेळाव्यात बोलताना खासदार लंके म्हणाले, कालच मी पवार (Sharad Pawar) साहेबांना सांगितलंय की, राहात्याचा निर्णय लवकर घ्या आणि माझ्यावर जबाबदारी देऊन टाका. मी करतो काय करायचे ते, असे सांगत लंके यांनी विधानसभेचे (Assembly) रणशिंग फुंकले.

नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके

डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर शरसंधान

वाडेगव्हाण गटाच्या वतीने आयोजित नागरी सत्कारास उत्तर देताना खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार शरसंधान साधले.

अवश्य वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, (Nilesh Lanke)

निवडणूक आयोगाकडे अर्ज करून मशिनची फेरतपासणी करण्यासाठी १८ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते मतदान मशिनमध्ये काहीही फेरफार होणार नाही. असे झाले तर संपूर्ण देशातील निवडणूकीवर संशय घेतला जाईल. याप्रसंगी खासदार लंके यांची वह्यातुला करण्यात आली. यावेळी बाबाजी तरटे, अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, सुदाम पवार, प्रा.संजय लाकूडझोडे, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, सतीश भालेकर, सचिन पठारे, कारभारी पोटघन, प्रकाश गुंड, सरपंच प्रियंका यादव, उपसरपंच एकनाथ शेळके, सदस्य चौताली यादव यांच्यासह विविध गावांचे सरपंच, चेअरमन, सदस्य, निलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here