Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 

Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 

0
Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 
Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 

Nilesh Lanke : नगर : नगर जिल्हा पोलीस (Police) प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील (Local Crime Branch) भ्रष्टाचाराविरोधात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आजपासून पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा पाऊस पडला. दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खासदार लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.  

Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 
Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 

नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले

तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार लंके म्हणाले, आमच्याकडे आज लेखी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या वाहने सर्रास सोडले जातात. अनेक ट्रकचालकांना लुटले जाते. श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजिविका बंद केली. पोलिसांची धटींगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गुल आहेत.

Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 
Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 

अवश्य वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले (Nilesh Lanke)

मी ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी केली त्यावेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले. ही धक्कादायक माहीती उजेडात आली त्यावेळी पोलीस अधिक्षक तसेच गुन्हे शाखेची चलाखी उजेडात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी त्यांच्याकडील अतिरिक्त कराभार काढून घेण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा खासदार लंके यांनी यावेळी दिला.  

Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 
Nilesh Lanke : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू 

यावेळी अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किरण काळे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, प्रकाश पोटे, बाबाजी तरटे, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, अ‍ॅड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, प्रा. संजय लाकूडझोडे, ज्ञानदेव  लंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते, तक्रारदार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here