Nilesh Lanke : पाेलीस प्रशासनाच्या विराेधात शशिकला राठाेडही उतरल्या मैदानात

Nilesh Lanke : पाेलीस प्रशासनाच्या विराेधात शशिकला राठाेडही उतरल्या मैदानात

0
Police : पाेलीस प्रशासनाच्या विराेधात शशिकला राठाेडही उतरल्या मैदानात
Police : पाेलीस प्रशासनाच्या विराेधात शशिकला राठाेडही उतरल्या मैदानात

Nilesh Lanke : नगर : सामान्य नागरिकांबरोबर महिला देखील नगर शहरात असुरक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी पोलीस (Police) प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड (Anil Rathod) यांच्या पत्नी शशिकला अनिल राठोड यादेखील मैदानात उतरल्या. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) कार्यालयासमोर सुरू असलेल्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी येऊन लंके यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे

अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष (Nilesh Lanke)

लंके यांनी अनिल राठोड यांच्या पावलावर पाऊल ठेवून अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला. आमदार अनिल राठोड यांची आठवण या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना झाली. नगर शहरात महिला कशा असुरक्षित आहेत, याच्या तक्रारींचा पाढाच राठाेड यांनी लंकेंसमोर वाचला. महिलांवरील अन्यायाला आळा घालणसाठी आपण अनिल राठोड यांच्याप्रमाणे सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलने करू, असे शशिकला राठोड यांनी सांगितले.

अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट

महिलांची आर्थिक फसववणूक (Nilesh Lanke)

शहरात सायबर क्राईम, सोशल मीडियाद्वारे महिलांची आर्थिक फसववणूक मोठ्या प्रमाणावर होते आहे. महिलांना फेसबुक इन्स्टाद्वारे अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करतात. पोलिसांवर दबाव आणतात. त्यामुळे पोलीस लाचखोरीचे प्रकार करून अपराध्यांना सोडून देतात. जागा बळकवण्याच्या अनेक प्रकारात महिलांचा वापर करून प्रकरणात आडव्या येणाऱ्या लोकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जातात. या प्रकारांकडे स्थानिक पोलीस सोईस्करपणे दुर्लक्ष करतात. सोनसाखळी, मंगळसूत्र, दागिने, रस्ता लूट, छेडछाड असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. शाळा महाविद्यालयात तसेच क्लासेस ज्या ठिकाणी भरतात, अशा ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लाेक रस्त्यावर घोळक्याने उभे असतात. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. या अत्याचारांचा बिमाेड करण्यासाठी राठोड यांच्या धर्मपत्नी या नात्याने आपण रस्त्यावर उतरू,  अशा प्रकरणाला खासदार निलेश लंके यांनी संरक्षण द्यावे, असे आवाहन शशिकला राठोड यांनी केले.


यावेळी निलेश लंके यांच्या आंदोलनस्थळी त्यांच्या मातोश्री शकुंतला लंके,  शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, योगीराज गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, नामदेव पवार आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here