Nilesh Lanke | नगर : नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा २७ कोटी ६० लाख रुपयांचे हप्ते वसूल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काल (बुधवारी) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लंके यांनी पोलीस (Police) वसूल करीत असलेल्या हप्त्यांचे रेटकार्डच जाहीर केले.
नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे
चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर (Nilesh Lanke)
खासदार लंके म्हणाले, पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. समाज भयभीत झालेला आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालते? खुनाचा तपास का लागत नाही? स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात. सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात. याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात. आज याच विभागाच्या चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पोलीस प्रशासनास पुरावे हवेत का? असा सवाल लंके यांनी यावेळी उपस्थित केला. खासदार लंके यांच्या उपोषणास तीन दिवस झाले तरी पोलीस अधीक्षक भेटीसाठी का येत नाहीत? असा प्रश्न
अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट
तनपुरे, फाळकेंची उपस्थिती (Nilesh Lanke)
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम वरीष्ठ अधिकारी करत आहेत का? सकारात्मक चर्चा होत असताना वरीष्ठ अधिकारी मात्र, वेगळाचा प्रस्ताव देतात. याचा अर्थ या भ्रष्टाचारास राज्याच्या गृह खात्याचे पाठबळ आहे, असा संदेश राज्यात जाईल. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यपातळीवर हे आंदोलन नेले जाईल, असा इशारा फाळके यांनी दिला. आता पोलीस अधीक्षकांशी आम्ही चर्चा करणार नाही. आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू असेही फाळके म्हणाले. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस दलास कलंक लावला असून त्यांना वरिष्ठ पातळवरून अधिकारी पाठीशी घालतात हे दुर्दैव असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
खासदार लंके यांनी जाहीर केलेले पोलिसांचे रेट कार्ड (Nilesh Lanke)
चंंदन तस्करी, रेशनींग ४० लाख
हिरा गुटखा ६८ लाख
विमल गुटखा ६० लाख
आरएमडी गुटखा २५ लाख
नगर शहर कॅफे ५० लाख
वाळू ट्रॅक्टर २ कोटी ५० लाख
वाळू गाडी ४ कोटी ८० लाख
जेसीबी १ कोटी ४० लाख
पोकलेन ५० लाख
आयपीएल सट्टा ५० लाख
वेश्या व्यवसाय हॉटेल ३० लाख
इतर अवैध व्यवसाय ५५ लाख
मटका ७ कोटी ५५ लाख
बिंगो १ कोटी ४० लाख
मावा ३ कोटी ३० लाख
दारू हॉटेल ७५ लाख
डिझेल, पेट्रोल तस्करी १२ लाख ५० हजार
ट्रक रिक्षा १० लाख
जुगार ७५ लाख