Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्या; खासदार निलेश लंकेंचे केंद्रीय आराेग्यमंत्र्यांना साकडे

Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्या; खासदार निलेश लंकेंचे केंद्रीय आराेग्यमंत्र्यांना साकडे

0
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्या; खासदार निलेश लंकेंचे केंद्रीय आराेग्यमंत्र्यांना साकडे
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्या; खासदार निलेश लंकेंचे केंद्रीय आराेग्यमंत्र्यांना साकडे

Nilesh Lanke : नगर : वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुविधा तसेच आराेग्य सेवेमध्ये चांगली सुधारणा व्हावी, यासाठी नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल काॅलेजला (Government Medical College) मान्यता द्या, असे साकडे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय आराेग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) यांना घातले आहे. यावर केंद्रीय मंत्री (Minister of Health) नड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात लवकरच शासकीय मेडिकल काॅलेजला मान्यता देऊ, अशी ग्वाही दिली.

नक्की वाचा : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी

मागणीस प्रतिसाद देण्याचा आग्रह (Nilesh Lanke)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत खासदार लंके यांनी नुकतीच मंत्री नड्डा यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यात शासकीय कॉलेजची आवश्यकता आहे. हे पटवून दिले. खासदार सुळे यांनीही खासदार लंके यांची मागणी रास्त असल्याचे सांगत लवकरात-लवकर त्यांच्या मागणीस प्रतिसाद देण्याचा आग्रह धरला. त्यावर नड्डा यांनी लंके यांच्या मागणीचा लवकरच सकारात्मक विचार झालेला असेल, असे आश्वासन दिले.

अवश्य वाचा : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर जाण्याची वेळ (Nilesh Lanke)

या मागणीसंदर्भात मंत्री नड्डा यांना देण्यात आलेेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची वेळ येते. त्यामुळे केवळ आर्थिक बोजा पडत नाही, तर पात्रता असलेले विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शासकीय मेडिकल कॉलेजची निर्मीती झाल्यानंतर  केवळ विद्यार्थ्यांना  शिक्षण मिळणार नाही, तर जिल्ह्यात आरोग्य सेवांमध्ये चांगली सुधारणा होणार आहे. नगर जिल्ह्यात आवश्यक ती जमीन तसेच पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय जनतेमधून नगर जिल्ह्यात शासकीय कॉलेज असावे, अशी मागणी आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत, असे नमूद केली आहे. 

लंकेंनी उमटविला कामाचा ठसा !
लोकसभा निवडणूकीत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपताच कांदा व दुधाच्या दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पोलीस दलातील भ्रष्टाचाराविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. आता शासकीय मेडिकल कॉलेजच्या मागणीसाठी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मंत्री नड्डा यांची भेट घेत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here