Nilesh Lanke : अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर; जनतेच्या सुरक्षिततेसाठी लंके मैदानात 

Nilesh Lanke : अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर; जनतेच्या सुरक्षिततेसाठी लंके मैदानात 

0
Nilesh Lanke

Nilesh Lanke : नगर : महापालिका (Municipality) हद्दीत पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे राेगराई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यू, मलेरिया (Dengue and Malaria), चिकनगुनिया, टायफाॅइड या सारख्या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागताे. त्यामुळे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) स्वतः जनतेच्या समस्या साेडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहे. त्यांनी महापालिकेने त्वरित प्रतिबंधात्मक उपाययाेजना (Preventive measures) करावी, अशी मागणी केली आहे.

अवश्य वाचा: “आई कुस्ती जिंकली, मी हरलेय”…ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला रामराम

पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला (Nilesh Lanke)

महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी महापालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये नियमितपणे डास निर्मूलन फवारणी करावी, तसेच रोगजन्य संसर्ग निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांसाठी महापालिकेने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, रोगराईवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लंके यांनी महापालिका प्रशासनाला पत्र धाडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here