Nilesh Lanke : नगर-साेलापूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टाेल आकारू नका; निलेश लंके यांनी भरला सज्जड दम

Nilesh Lanke : नगर-साेलापूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टाेल आकारू नका; निलेश लंके यांनी भरला सज्जड दम

0
Nilesh Lanke

Nilesh Lanke : नगर : नगर-सोलापूर महामार्गावरील (Nagar-Solapur Highway) बनपिंप्री येथील टोल नाक्यावर (Toll Plaza) करण्यात येणारी टोल वसुली खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी थांबविली. या रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच टोल वसूल करण्यात येत असल्याने खासदार लंके यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नका, असा सज्जड दम भरला.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

बनपिंप्री टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली

 नगर-सोलापूर मार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. काम अपूर्ण असतानाही टोल वसुली करण्यात येत असल्याबाबत खासदार लंके यांच्याकडे यापूर्वी काही तक्रारी आल्या होत्या. शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी खासदार लंके हे नगर-सोलापूर मार्गाने जामखेडकडे जात असताना बनपिंप्री टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली करण्यात येत होती.

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

कर्मचाऱ्यांना जाब विचाल्यानंतर वरिष्ठांकडे दाखविले बोट (Nilesh Lanke)

त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले. खासदार लंके यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम अपूर्ण असताना टोल वसुली करण्याचे कारण काय, असा सवाल लंके यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबविण्यात येईल, असे अधिकाऱ्याने खासदार लंके यांना सांगितले व संबंधित कर्मचाऱ्यांना टोल वसुली न करण्याबाबत सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here