Nilesh Lanke : मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती – निलेश लंके

Nilesh Lanke : मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती - निलेश लंके

0
Nilesh Lanke : मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती - निलेश लंके
Nilesh Lanke : मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती - निलेश लंके

Nilesh Lanke : पारनेर : मला लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections) लढवायची नव्हती. ही निवडणूक (Election) खेटाखेटीत झाली. मला कोणी खेटलं तर जमत नाही हे जगाला माहिती आहे. विधानसभेत मी आनंदी होतो, असे सांगतानाच लोकसभेची जबाबदारी आल्यावर आपण काम करून दाखविणार असून पाच वर्षांत निष्क्रिय नव्हे तर राज्यात कामाचा ठसा उमटविणार आहोत, असा विश्‍वास खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी व्यक्त केला.

अवश्य वाचा: महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाचा शिक्कामाेर्तब : मंत्री विखे पाटील

जवळे येथील विविध विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, सरपंच जयसिंग मापारी, किसनराव रासकर, भाऊसाहेब आढाव, प्रदीप सोमवंशी, बाळासाहेब सालके, संदीप सालके, सुभाष आढाव, सुवर्णा धाडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला खासदार लंके यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

नक्की वाचा: ‘छगन भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार’-मनोज जरांगे

खासदार लंके म्हणाले,

माझ्या विजयानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर निघोज मधील एकाने माझी खासदारकी जाणार अशी पोष्ट केली. मात्र, मी समोरच्याची जिरवली ना? न्यायालयात जरी काही झाले आणि निवडणूक झाली तरी पुन्हा दोन-तीन लाखांनी पराभव करेल. न्यायालयाचा काय निकाल लागणार आहे. मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते निवडणुकीपूर्वी एक महिना करण्यात आले. ती पुस्तके ५० रूपये देऊन गोळा करण्यात आली. मला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यांना कोर्ट कचेरीसाठी वेळ दिला आहे. त्यांना पराभव मान्य नाही, अशी घणाघाती टीका लंके यांनी केली.

माझी मागणी अनं अजित पवारांची घोषणा (Nilesh Lanke)

दूध भेसळ करणारांवर कारवाईची मागणी आपण संसदेत केली. आपल्या भाषणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्या दिवशी दूध भेसळ करणारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची घोषणा केली. आपल्या मागणीची दखल राज्यात घेतली गेल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here