Nilesh Lanke : नगर -मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी ८५ लाखांचा निधी मंजुर; नीलेश लंके यांची माहिती

Nilesh Lanke : नगर -मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी ८५ लाखांचा निधी मंजुर; नीलेश लंके यांची माहिती

0
Nilesh Lanke

Nilesh Lanke : नगर : अनेक दिवसांपासून रखडलेल्या नगर-मनमाड रस्त्याची (Nagar-Manmad road) दुरूस्ती अखेर मार्गी लागली असून खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या शिष्टाईनंतर या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी ८५ लाखांचा निधी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंजुर केला आहे. अशी माहित खा. नीलेश लंके यांनी दिली. दरम्यान या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळया यादीत टाकण्यात आले असून लवकरच या रस्त्याच्या कामासाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही खा. लंके यांनी सांगितले.

नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने

जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शनी शिंगणापूर व शिर्डीकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी निविदा मंजुर झाल्यानंतर ३८ टक्के कमी दराने ठेकेदाराने हे काम घेतले होते. त्यामुळे हे काम अनेक वर्षे प्रलंबित राहिले. रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने होऊनही हा प्रश्‍न मार्गी लगला नाही. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दि. २२ जून रोजी भेट घेऊन नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते.

अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …

मंत्री गडकरींनी घेतली मागणीची दखल (Nilesh Lanke)

मंत्री गडकरी यांनी खा. लंके यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित ठेकेदारास निलंबित करून नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मंत्री गडकरी यांच्या आदेशानुसार जुन्या ठेकेदारास निलंबित करण्यात येऊन नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने काम सुरू होईपर्यंत या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी दि.१० जुलै रोजी मंजुर करण्यात आला. दि.१८ जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून जय हिंद बिल्डर्स या एजन्सीला काम देण्यात आले असून लवकरच या कामास प्रारंभ होईल असे खासदार लंके यांनी सांगितले.