Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले; नीलेश लंके झाले नाराज 

Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले; नीलेश लंके झाले नाराज 

0
Nilesh Lanke
xr:d:DAF5Y3epXKI:902,j:3109033563233999095,t:24040513

Nilesh Lanke : नगर : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नगर दक्षिणे मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. मात्र, तिसगावमध्ये सभेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नियोजन फिस्कटल्याने लंके हे नाराज होऊन परतल्याची चर्चा सध्या राजकीय (Political) वर्तुळात रंगली आहे.

नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश

स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यांमध्ये ही जनसंवाद यात्रा होत असून आज याचे नियोजन तिसगाव या ठिकाणी होते. मात्र, सभेचे नियोजन न झाल्यामुळे लंके यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त करत ते शिरापूरकडे रवाने झाले, अशी चर्चा आहे. दरम्यान, लंके यांनी स्थानिक नागरिकांचे संवाद साधत त्या ठिकाणावरून रवाना झाल्याचे व्हिडिओ देखील आता प्रसारित होत आहेत.

Nilesh Lanke
xr:d:DAF5Y3epXKI:903,j:4932991412720349197,t:24040513

हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका

दिलीप भालसिंग यांची टीका (Nilesh Lanke)

लंके यांच्या जनसंवाद यात्रेवरती टीकाटिप्पणी करताना भाजपचे नगर जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले की, ही जनसंवाद यात्रा नसून ही फसवणूक यात्रा आहे. लोक लंके यांच्या जनसंवाद यात्रेला प्रतिसाद देणार नाही, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा ते सुजय विखे यांनाच निवडून देतील असा विश्वास देखील भालसिंग यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here