Nilesh Lanke : नगर : केंद्र सरकारच्या (Central Govt) प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत नगर शहरासाठी ४० इलेक्ट्रिकल बसला (Electrical Bus) मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या बसेल नगर महापालिकेच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिली. या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एका नव्या युगाचे पाऊल पडणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
नक्की वाचा: पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार
खासदार लंके म्हणाले,
महापालिकेचे अधिकारी तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसमवेत या प्रकल्पासाठी अनेक बैठका होऊन त्यात सकारात्मक चर्चा झाल्या होत्या. त्याचाच परिपाक म्हणून या ४० बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक परिवहन सुधारण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नमुद करून खासदार लंके म्हणाले, या उपक्रमामुळे शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील प्रवाशांना सोईस्कर आणि पर्यावरणपुरक वाहतूक उपलब्ध होणार आहे. प्रदुषण होणार नसल्याने वायू गुणवत्तेत सुधारणा होईल तसेच वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, ग्रामीण भागातील प्रवासी या बस सेवेचा लाभ घेऊ शकतील. त्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे. ही बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तसेच परिवहन समितीशी चर्चा करण्यात येणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
अवश्य वाचा: कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार
नगर शहर व केडगावमध्ये चार्जिंग स्टेशनची निर्मिती (Nilesh Lanke)
नऊ मीटर लांबीच्या या बसेसच्या चार्जिंगसाठी नगर शहर व केडगावमध्ये चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे. पार्किंग डेपोही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगर शहरातील नागरिकांना बसेसची सुविधा देताना शहरातील नागरिकांसाठी तसेच नगर शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी शहरापासून सुमारे २५ किलोमिटर अंतरावरील महामार्गांवर ही बस सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. ज्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे खासदार लंके यांनी स्पष्ट केले.