Nilesh Lanke : ‘सफाई कामगारांचे योगदान एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे’

Nilesh Lanke : 'सफाई कामगारांचे योगदान एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे' 

0
Nilesh Lanke : 'सफाई कामगारांचे योगदान एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे' 
Nilesh Lanke : 'सफाई कामगारांचे योगदान एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे' 

Nilesh Lanke : नगर : नगर महापालिकेच्या (AMC) सफाई कामगार बांधव व भगिनींनी ज्या समर्पणाने आणि निष्ठेने आपल्या शहराची स्वच्छता कायम ठेवली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान केला. आपल्या रस्त्यांपासून ते गटारांपर्यंत, मोकळ्या जागांपासून ते चेंबरांपर्यंत सफाई कामगारांनी आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. सफाई कामगारांचे (Cleaning Workers) योगदान एसी केबीनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सफाई कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाविकास आघाडीतर्फे नगर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक योगीराज गाडे, शहर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, ज्ञानेश्वर येवले, विशाल वालकर, रामेश्वर सोलाट, राजेंद्र दळवी, ओमकार सातपुते आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!

लंके म्हणाले (Nilesh Lanke)

चार घरात जर आमच्या मदतीमुळे आनंदाची चूल पेटणार असेल तर तुम्हाला समाधान पाहीजे. कामगाराच्या बाबतीत राजकारण करू नका. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, कामगाराचे प्रश्न  सोडवण्याचे प्रयत्न करू.  सफाई कामगाराना बुट, हॅडगोल्ज मिळत नाही ही कोणती महानगरपालिका आहे ? यांच्यापेक्षा छोटया ग्रामपंचायती चांगल्या आहेत. सुविधा न मिळता बीलेही काढली जात आहेत? गरिबांचे टाळूवरचे लोणी किती दिवस खाणार ?चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे असतात. आज तुम्ही सूपात असाल तर उदया  जात्यात जाणार आहात. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे ही आमची सर्वाची विचारधारा असल्याचे लंके यांनी सांगितले. 

स्वच्छतेच्या सेवेला सलाम (Nilesh Lanke)


सफाई कर्मचारी बांधव आणि भगिनींनी आपल्या कामातून नगर शहराला स्वच्छतेचा आदर्श दिला आहे. माझा माणूस हा आनंदी झाला पाहिजे मोठयाचा सत्कार तर कोणीही करतो. मात्र, तुमच्या सारख्या गरिबांचा सत्कार मला करायचा होता. सफाई कामगारांशी माझ नात आहे, नात्यागोत्यातील लोकांकरीता काहीतरी केले पाहिजे, असे खासदार लंके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here