Nilesh Lanke : पारनेर : शासनाकडून (Government) गरीब कुटूंबासाठी घरकुल उभारणीसाठी देण्यात येणारा निधी अतिशय तुटपुंजा असून शासनाने एका घरकुलासाठी किमान चार लाख रूपये निधी देण्याची आग्रही मागणी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संसदेच्या (Parliament) सभागृहात केली.
नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
कमीत कमी 4 लाख रूपये मिळणे अपेक्षित
संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त खासदार लंके हे नवी दिल्लीमध्ये असून अधिवेशनात सहभागी होत त्यांनी घरकुलांच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले. खासदार लंके म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही महत्वाचे बदल आवश्यक आहेत.अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, परंतू घरकुलांची संख्या अत्यंत कमी आहे. महागाईचा विचार करता ग्रामीण व शहरी भागातील घरकुलांसाठी देण्यात येणारा निधी फारच तुटपुंजा आहे.
अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
जास्तीत जास्त घरकुले मिळावीत, अशी अपेक्षा (Nilesh Lanke)
घरकुलासाठी १ लाख २० हजार घरकुलासाठी, शौचालयासाठी १२ हजार रूपये, २६ ते २८ हजार मनरेगामधून असा एका घरकुलासाठी १ लाख ५८ हजार ते १ लाख ६० हजार दिले जातात. माझी मागणी आहे की, एका घरकुलासाठी कमीत कमी चार लाख रूपये मिळणे अपेक्षित आहे. घरकुलासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही. जागा उपलब्ध झालीच तर त्या जागेचा उतारा मिळत नाही. त्यात सुधारणा करून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त घरकुले मिळावीत, अशी अपेक्षा खासदार लंके यांनी सभागृहात केली.