Nilesh Lanke : नगर : नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या (Nagar-Pune Intercity Railway) लाईनचे काम केवळ मेंन्टनन्स पॉईंट उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी खासदर नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी बुधवारी संसदेत (Parliament) केली.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार
नगर ते पुणे रेल्वेमार्ग अनेक महत्वाच्या शहरांशी सबंधित
सभागृहाचे लक्ष वेधून खासदार लंके यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर ते नगर व नगर ते पुणे रेल्वेमार्ग अनेक महत्वाच्या शहरांशी सबंधित आहे. या मार्गावर श्री क्षेत्र देवगड, श्री क्षेत्र शनि शिंगणापूर, श्री क्षेत्र शिर्डी आणि गणपती रांजणगांव ही महत्वपूर्ण धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.
अवश्य वाचा : अवैध दारू विरोधात महिला आक्रमक; दुकान पेटवले
हा रेल्वे मार्ग झाल्यास अनेक प्रवाशांचा प्रवास सुलभ (Nilesh Lanke)
या मार्गावर वाळुंज, सुपा, गणपती रांजणगाव, पुणे हे औद्योगिक क्षेत्र आहेत. तिथे काम करणारे अनेक मजुर, कामगार, व्यापारी यांनाही प्रवास करावा लागतो. हा रेल्वे मार्ग झाल्यास अनेक प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल तसेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. या मार्गावर पुणे, संभाजीनगर व शिर्डी ही विमानतळे असल्याने हा मार्ग महत्वपूर्ण आहे. तसेच नगर-कल्याण रेल्वेमार्गाचे काम सुरू होणेही महत्वाचे आहे. बीड, नगरचे लोक पुणे, मुंबई, कल्याणशी निगडीत आहेत. त्यासाठी हा मार्ग सुरू करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी खासदार लंके यांनी केली.