Nilesh Lanke : नगर : देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव (Onion Prices) कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क (Export Duty) तात्काळ हटविण्याची मागणी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal), राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्याकडे केली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये थंडीची लाट; जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे केले हे आवाहन
भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाबाबत चर्चा
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री पियुष गोयल यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार बजरंग सोनवणे, खा. शोभा बच्छाव, खा. राजाभाऊ वाझे, खासदार गोवाल पाडवी, खासदार वर्षा गायकवाड, खासदार भास्कर भगरे, खासदार मारूतीराव कोवासे यावेळी उपस्थित होते. यावेळी खा. लंके यांनी गोयल यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्रातील कांदा उत्पादन तसेच भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाबाबत चर्चा केली.
अवश्य वाचा : सौंदाळा ग्रामसभेने घेतला आदर्शवत ठराव; शिव्या दिल्या तर होतोय 500 रुपयांचा दंड
कांदा उत्पादकांना सोसावे लागत आहे मोठे नुकसान (Nilesh Lanke)
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील कांद्याला विदेशात मागणी असल्याने परदेशात मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात केली जाते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. अगोदरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. असे असताना सरकारने कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या शुल्कामुळे कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होत असल्याचे खा. लंके यांनी म्हटलं आहे. राज्यमंत्री जितिन प्रसाद यांना निवेदनकेंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची खासदार नीलेश लंके यांनी भेट घेऊन कांद्याचे भाव कोसळल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे निदर्शनास आणून दिले. वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी लंके यांनी केली. राज्यमंत्री जितिन प्रसाद यांना खासदर लंके यांनी निवेदन सादर केले.