Nilesh Lanke : खासदार लंकेंची भेट आणि आरोग्यसेवकांना नियुक्त्या !

Nilesh Lanke

0
Nilesh Lanke : खासदार लंकेंची भेट आणि आरोग्यसेवकांना नियुक्त्या !
Nilesh Lanke : खासदार लंकेंची भेट आणि आरोग्यसेवकांना नियुक्त्या !

आरोग्य सेवकांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा

Nilesh Lanke : अहिल्यानगर : जिल्ह्यातील ५० टक्के आरोग्यसेवक भरती (Health Worker Recruitment) प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हा परिषदेचे (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भेट घेत आरोग्य सेवकांच्या नियुक्त्यांबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर भंडारी यांनी उमेदवारांचे समुपदेशन करत उमेदवारांना तात्पुरत्या नियुक्त्यांचे आदेश दिले.

नक्की वाचा : मोठी बातमी! मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून ५ जणांचा मृत्यू

प्रश्न मार्गी लावण्याची केली होती मागणी

आरोग्य सेवकांच्या या प्रश्नासंदर्भात दि.२९ मे रोजी खा. नीलेश लंके यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना लेखी पत्र देऊन आरोग्य सेवकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री गोरे व अधिकारी भंडारी यांनी दिली होती.

अवश्य वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

तात्काळ निवडीचे ऑनलाईन आदेश (Nilesh Lanke)

हा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे आरोग्य सेवकांकडून सांगण्यात आल्यानंतर आरोग्य सेवकांनी खा. लंके यांची भेट घेत त्यांच्याकडे पुन्हा गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी नगरमध्येच असलेल्या लंके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जात या उमेदवारांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.

Nilesh Lanke : खासदार लंकेंची भेट आणि आरोग्यसेवकांना नियुक्त्या !
Nilesh Lanke : खासदार लंकेंची भेट आणि आरोग्यसेवकांना नियुक्त्या !

या भरती प्रक्रियेतील १८७ उमेदवारांना अद्याप कामावर रूजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले नव्हते. त्याबाबत खा. लंके यांनी आनंद भंडारी यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर या उमेदवारांना तात्काळ निवडीचे ऑनलाईन आदेश देण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव, सरपंच आदीनाथ गायकवाड, भानुदास आग्रे, गणेश तोडमल, प्रवीण वारूळे, यांच्यासह आरोग्य सेवक उपस्थित होते. खा. लंके यांनी या प्रश्नात लक्ष घालून तो तडीस नेल्याबद्दल खा. लंके यांच्याप्रती आरोग्य सेवकांनी कृतज्ञता व्यक्त केली.