Nilesh Lanke : नगर : पुणे-अहिल्यानगर (Pune-Ahilyanagar) या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या (Railway) बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला (Railway Board) सादर केला असून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्याखासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रयत्नांचे ते मोठे यश मानले जात आहे.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर
या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल. सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाची प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीची दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी निवडणूकीनंतर लगेच संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी खर्च अपेक्षीत (Nilesh Lanke)
अहवाालानुसार या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे.
या रेल्वेमार्ग ११६ किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणेदरम्यान ११ स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या मार्गाने हा रेल्वेमार्ग अहिल्यानगर रेल्वेस्थानकाशी जोडला जाणार आहे.