Nilesh Lanke : नगर : कुकडी डावा कालव्याचे येत्या २५ मेपासून आवर्तन सोडा, अशी मागणी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
हे देखील वाचा: मांडओहोळ जलाशयात नगरचे दोघे बुडाले
निवेदनात म्हटले आहे की
कालवा सल्लागार समिती कुकडी व घोड प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडण्याबाबत चर्चा झाली होती. तसे निर्देशही अध्यक्षांनी दिले होते.
डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस
२५ मे पासून आवर्तन सुरू करण्याची मागणी
मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी २५ मे पासून आवर्तन सुरू करण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे.