Nilesh Lanke : नगर : पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकरी व नागरिकांची जीवनरेखा ठरणाऱ्या मांडओहळ मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची १ मीटरने वाढवावी, अशी ठोस मागणी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्यसभेचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली. या मागणीमुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त (Drought) भागात दिलासा मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या
पारनेरच्या उत्तर भागातील महत्वाचा प्रकल्प (Nilesh Lanke)
मांडओहळ मध्यम प्रकल्प हा पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्टयासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. सध्या धरणाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा २१० दशलक्ष घनफूट आहे. मात्र, दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते. खासदार नीलेश लंके यांच्या मते, जर धरणाच्या सांडव्याची उंची केवळ १ मीटरने वाढविण्यात आली तर धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढेल. या वाढीमुळे पारनेर तालुक्याच्या जवळपास अर्ध्या भागात सिंचन वाढले जाईल तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मोठ्या सुटू शकतो.