Nilesh Lanke : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार लंके यांची मागणी

Nilesh Lanke : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार लंके यांची मागणी

0
Nilesh Lanke : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार लंके यांची मागणी
Nilesh Lanke : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार लंके यांची मागणी

Nilesh Lanke : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान (Heavy Rain) पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Damage Compensation) मिळावी, अशी मागणी केली आहे.

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

शेतकऱ्यांचे नुकसान निदर्शनास दिले आणून

तूर, कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगाव तालुक्यातील खामगाव, हिंगणगाव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगाव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खासदार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

तातडीने पिकांचे पंचनामे करण्याची मागणी (Nilesh Lanke)

शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत, त्यामुळे प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी केली.