Nilesh Lanke : सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना खासदार निलेश लंकेंनी पळविले; ठोकळ यांचा आरोप

Nilesh Lanke : सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना खासदार निलेश लंकेंनी पळविले; ठोकळ यांचा आरोप

0
Nilesh Lanke : सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना खासदार निलेश लंकेंनी पळविले; ठोकळ यांचा आरोप
Nilesh Lanke : सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना खासदार निलेश लंकेंनी पळविले; ठोकळ यांचा आरोप

Nilesh Lanke : नगर : जिल्ह्यात तीन हजार कोटीचा सिस्पे इन्फिनिटी घोटाळा (Sispe Infinity Scam) होऊन यातील आरोपी मोकाट आहेत. या गुन्हेगारांना खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) मदत करत असून, त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपचे (BJP) जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ (Manoj Thokal) यांनी केला आहे. तसेच याबाबतचे सर्व पुरावे आर्थिक गुन्हे शाखेला (Economic Offence Wing) देऊनही त्यावर कारवाई केली जात नाही. पोलीस यंत्रणेची भूमिका संशस्यास्पद असून, येत्या १५ दिवसांत कारवाई न झाल्यास गुंतवणूकदारासोबत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

पैसे न देता गुंतवणूक दारांची फसवणूक

गुंतवणूकदारांना ज्यादा आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून सिस्पे व इन्फिनिटीमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. दीड लाख गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले होते. दर महिन्याला आकर्षक परतावा दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, पैसे न देता गुंतवणूक दारांची फसवणूक झाली. गुंतवणूकदारांचे जवळपास तीन हजार कोटी रुपये अडकले आहेत. वाढत्या तक्रारी पाहता श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी फरार आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात

आरोपी हा संसद भवनात खा.लंके यांना भेटला (Nilesh Lanke)

मुख्य आरोपी विनोद गाडीलकर हा संसद भवनात खा.लंके यांना जाऊन भेटला आहे. याबाबतचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. लोकांचे पैसे देत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. वेळ पडली तर दुबईला जाणार असल्याचे आरोपी गाडीलकर याने गुंतवणूकदारासोबत व्हॉटसअपवर चर्चा करताना सांगितले आहे. आरोपी विनोद गाडीलकर संसद भवन परिसरामध्ये अखेरीस दिसला. त्यानंतर तो फरार झाला आहे. त्यामुळे गाडीलकर याला खा. लंके यांनीच फरार केले आहे, असा आरोप ठोकळ यांनी केला आहे.येत्या १५ दिवसांत कारवाई न झाल्यास गुंतवणूकदारांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मनोज ठोकळ यांनी दिला आहे. यावेळी बबन घुले, राहुल बन्सी सोनवणे उपस्थित होते.