Nilesh Lanke : नगर : माझं लोकसभेतलं (Lok Sabha) पहिलं भाषण इंग्रजीतच असेल. सगळ्यांनी टीव्ही चालू करून बसा, मग कळेल मी इंग्रजी (English) बोललो की उर्दू बोललो, असे म्हणत खासदार नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) संगमनेर येथे झालेल्या सत्कार साेहळ्याप्रसंगी जाेरदार हशा पिकवला.
नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
निकाल जाहीर होऊन १५ दिवस झाले तरीही चर्चा कायम
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन १५ दिवस झाले आहेत. तरीही निकालांची चर्चा कायम आहे. महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. नगर येथील जागा नीलेश लंकेंनी जिंकली. नीलेश लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिकिट दिलं होतं. त्यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक
विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच लंके यांनी बांधला फेटा
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच लंके यांनी फेटा बांधला. बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा बांधल्यावरच मी फेटा बांधेन, असं ते म्हणाले होते. संगमनेर येथील भाषणात त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
Hi I am good