Nilesh Lanke : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) महानगरपालिकेचे माजी महापौर (EX Mayor) तथा शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु हे प्रकरण म्हणजे हनीट्रॅप (Honey Trap) असल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे.
हेही वाचा : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १९ जणांचा मृत्यू
तडजोड करून रक्कम स्वीकारली
ज्या महिलेने हे आरोप केले आहेत तिने या आधी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील एका युवकासोबतही असाच प्रकार केला होता. त्याच्याकडून तडजोड करून काही रक्कम उकळल्याचा दावाही लंके यांनी केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सोबतच त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत. त्यावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली.
नक्की पहा : संजीवनी वाघ हिच्या हट्टामुळे वातावरण बिघडलं; बुलढाण्यातील चिखलीच्या सरपंचाचा दावा
काय म्हणाले लंके? (Nilesh Lanke)
निलेश लंके म्हणाले की, “हा संपूर्ण प्रकार हनी ट्रॅपचा आहे. अभिषेक कळमकरवर ज्या महिलेने आरोप केले आहेत त्या महिलेने पुणे जिल्ह्यात एका युवकाबाबत असाच एक प्रकार केला आहे. त्या प्रकरणात फिर्यादी महिलेने संबंधित युवकाकडून तडजोडनामा करून काही रक्कम देखील घेतली आहे.”



